संतापजनक!!!! पुण्यातील “या” नामांकित संस्थेत महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंगचा घडला प्रकार

संतापजनक!!!! पुण्यातील “या” नामांकित संस्थेत महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंगचा घडला प्रकार

पुणे

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंग करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका नामांकित सायन्स रिसर्ट इन्स्टिट्यूटच्या शौचालयात ही घटना घडली.

पीडित महिला शौचालय वापरत असाताना त्यांच्या बाजुच्या शौचालयातील अज्ञात व्यक्तिने शौचालयाच्या खालच्या बाजूने त्याचा मोबाईल धरता आणि पीडित महिला ही शौचालयाचा वापर करीत असताना तिचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितनुसार कलम ३५४ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चतुशृंगी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा चतुशृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *