संजीवनी न्युज ने केली पोलखोल ; पोलिसांना शुट ऑर्डरच नाही, मग “त्या” गावच्या ग्रुपवर सरपंचांचे पतींने का भयभीत केले ग्रामस्थांना ???

संजीवनी न्युज ने केली पोलखोल ; पोलिसांना शुट ऑर्डरच नाही, मग “त्या” गावच्या ग्रुपवर सरपंचांचे पतींने का भयभीत केले ग्रामस्थांना ???

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सामान्य नागरिकामध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे त्याला कारण असे की आंबळे गावचे विद्यमान सरपंच यांचे पती असणारे गावचे माजी उपसरपंच यांच्या व्हाट्सअप पोस्टमुळे.

परवा दिवशी रात्री ९ वाजुन पाच मिनिटांनी या महाशयांनी एका व्हाट्सअप ग्रुपवर मँसेज केला की रेल्वे भागात रात्री ९ ते पहाटे पाचपर्यंत कोणीही जाऊ नये जर गेलात तर रेल्वे पोलिसांना पुर्वकल्पना द्यावी त्यांना शुट ऑर्डर मिळाली आहे.

या व्हाट्सअप मँसेजच्या अनुषंगाने संजीवनी न्युजने रेल्वे पोलिस गणेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की अशा प्रकारे शुट करण्याची कोणालाच कसलीच ऑर्डर नाही पण उगाचच लोकांना भयभीत करण्यासाठी कोणीही व्हाट्सअप ग्रुपवर कसलेही मँसेज करु नयेत असे सांगीतले.

याबाबत सरपंचांचे पती यांच्याशी विचारपुस केली असता तस काही लेखी पत्र नाही असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *