शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याजपरतावा सप्टेंबर अखेर न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जणआंदोलन उभारू : सुनिल चांदेरे

शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याजपरतावा सप्टेंबर अखेर न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जणआंदोलन उभारू : सुनिल चांदेरे

मुळशी

शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याजपरतावा सप्टेंबर अखेर न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जणआंदोलन उभारू असा इशारा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी सरकारला दिला ते म्हसवेश्वर सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हसोबा मंदिर खारावडे येथे पाहुणे म्हणून बोलत होते.

मुठा खोऱ्यातील म्हसवेश्वर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.सुनिल चांदेरे यांचे प्रमुख उपस्थितीत व चेअरमन मा.वृंदाताई येनपुरे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

म्हसवेश्वर ही मुळशी तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी असून 10 गावचे कार्यक्षेत्र व सोसायटी चे एकूण 1700 सभासद आहेत ,77 लाख रुपये भागभांडवल आहे ,14 लाख रूपये संस्थेची रिफंड गुंतवणूक असून pdcc बँकेकडे 25 लाख रुपयांचे शेअर्स आहेत,आज अखेर संस्थेच्या माध्यमातून 3 कोटी 36 लाख रुपये पीक व मध्यम मुदत कर्ज वाटप केले आहे.

यावेळी अनेक सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चांदेरे यांनी आपल्या मनोगतात सविस्तरपणे समाधानकारक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे सर्व शंकाचे निरसन केले. तर सर्व सोसायट्यांनी कर्ज वाटपाबरोबरच अनेक शेतीपूरक व्यवसाय करावेत व सभासदांना जास्तीत जास्त नफा मिळवून द्यावा यासाठी महाराष्ट्रातील काही यशस्वी सोसायट्यांची उदाहरणे दिली.

तसेच तत्कालीन सरकारने व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेप्रमाणे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपयांपर्यंत चे प्रोत्साहन पर अनुदान या महिन्यात जमा होईल याचा फायदा म्हसवेश्वर सोसायटीच्या 180 सभासदांना होणार आहे ही आनंदाची बाब असून आशा खातेदारांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी आशा सर्व खातेदारांची यादी फोटोसाहित प्रत्येक गावच्या दर्शनी भागावर लावून त्यांना प्रसिद्धी द्यावी अशीही सूचना केली.

तसेच सोसायटीच्या थकबाकीची वसुली 100% होण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही विनंती केली. आपला तालुका डोंगरी भागातील असूनही वसुलीसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उत्तमरीत्या प्रयत्न करत असल्याने जिल्ह्यात आपल्या तालुका वसुलीतअव्वल असल्याने बँकेच्या अधिकारी वर्गाबाबत समाधान व्यक्त केले.तर तालुक्यातील युवकांनी मुळशीतील आपल्याला लाभलेल्या निसर्गसौंदर्याचा सदुपयोग करून कृषी पर्यटनाकडे कल वाढवावा त्यासाठी आवश्यक ती सर्वोतोपरी मदत बँकेच्या माध्यमातून केली जाईल असे आश्वासन देखील उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी माजी सभापती मा. महादेव कोंढरे ,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.अंकूश उभे , बँकेचे तालुका वसुली अधिकारी रमेश मारणे , विकास अधिकारी कंधारे ,सोसायटीचे माजी चेअरमन व आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे ,सोसायटीचे आजी माजी संचालक,पोलीस पाटील रामदास मानकर, अंदगाव चे सरपंच प्रफुल्ल मारणे,माजी चेअरमन निलेश चवले ,अशोकराव मारणे, सचिव मा.आनंद कुढले,मा.भाऊ शेडगे, मा.अध्यक्ष मा.विठ्ठल गुजर ,प्रगतशील शेतकरी मा.दगडू मारणे,मा.सरपंच अंकुश येणपुरे, बबन मारणे,व शेतकरी सभासदमोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ऑल इंडिया पेंशन्सनर संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा.एन.डी. मारणे गुरुजी, पुणे पोलीस काशिनाथ उभे, प्रगतशील शेतकरी कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते दगडू मारणे व तुकाराम मरे तसेच गुणवंत विध्यार्थ्यांचा सोसायटीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अशोक चवले यांनी तर सूचना पत्राचे वाचन सचिव आनंद कुढले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *