शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे,अन्यथा……

शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे,अन्यथा……

पुणे

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवतारे यांनी अजित पवारांबद्दल अत्यंत चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा जिंकणं सोप असणार नाही, राष्ट्रवादीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मनात आणलं तर निकाल वेगळा लागू शकतो, असा इशारा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

२०१९ ला लोकसभेला त्या मतदारसंघात मोठ्या मतधिक्क्याने राष्ट्रवादीचा विजय झाला. बारामती लोकसभा मतदारसंघ सातत्याने विकासकामांसाठी राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे. शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे. राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत ज्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वातावरण गढूळ करू शकतात.

त्यावेळी आमचे श्रद्धास्थान शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका तत्कालीन मंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्याला प्रतिआव्हान अजित दादांनी केलं होत. महाराष्ट्राला माहित आहे अजित पवार जे बोलतात ते करून दाखवतात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते राष्ट्रवादीचे श्रद्धास्थान अजित पवार, सुनील तटकरे बारामती आणि रायगड मतदारसंघावरून सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते आघात करत असतात.

त्याला चोख प्रत्युत्तर आम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आवर घालावी, अशी विनंती परांजपे यांनी केली आहे.ठाण्यातील तीनही लोकसभेवर कोण उमेदवार देतात त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला विश्वास आहे तीनही जागांवर महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.

महायुतीतील प्रत्येक पक्षाला लवकरच सन्मानपूर्वक जागा मिळणार असून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील. तसंच महायुतीचे उमेदवार ठाणे, कल्याण , भिवंडी मतदारसंघातून विक्रमी मतधिक्याने निवडून आले पाहिजे. मात्र विजय शिवतारे आमच्या आमच्या शक्तिस्थळवर आघात करत असतील तर स्वाभिमानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कल्याण लोकसभेवर वेगळं चित्र निर्माण करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *