पुणे
सासवड शरद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड या पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी सासवडचे दत्तात्रय हरिभाऊ टिळेकर यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेच्या सासवड येथील सभागृहात सदरची निवडणूक झाली. श्री टिळेकर हे विद्युत मंडळ पारेषण कंपनीचे वाहतूक कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते सन 1993 सालापासून कार्यरत आहेत. यापूर्वीचे उपाध्यक्ष श्री रूपचंद बाबुराव कांडगे यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार संपल्याने राजीनामा दिलेला होता. त्यांच्या रिक्त जागेवर या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने श्री टिळेकर यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन एम. के. गायकवाड व माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक, रूपचंद कांडगे, लक्ष्मण फडतरे, अलका फडतरे हे संचालक उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक विजयदादा कोलते, प्रतिभा महिला पतसंस्थेच्या चेअरमन शशिकला कोलते, गुरोळी गावचे माजी सरपंच व अंजीर सिताफळ संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.