विरोधकांना महायुती झंडू बाम देणार.‘झंडू बाम,काम तमाम’; ताई, माई,अक्का,कपटी सावत्र भावांना मारा बुक्का

विरोधकांना महायुती झंडू बाम देणार.‘झंडू बाम,काम तमाम’; ताई, माई,अक्का,कपटी सावत्र भावांना मारा बुक्का

पुणे

महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची विरोधकांना धडकी भरली आहे. योजनेस विरोध करणारे हे सावत्र भाऊ आहेत, त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून नका त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य धडा शिकविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. १३) केले.

जळगावात ‘लाडक्या बहिणींशी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. सर्व घटकांसाठी योजना देण्याचे काम करणाऱ्या महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन करीत त्यांनी विधानसभेचे रणशिंगच फुंकले.

शहरातील सागरपार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमात मंचावर मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील यांच्यासह खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील, संजय सावकारे आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व गरीब बहिणींच्या सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे. विरोधक कितीही चुकीचा प्रचार करीत असले तरी ही योजना कधीच बंद होणार नाही. योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे. योजनेस विरोध करीत कोर्टात जाणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले. महिलांसह सर्व घटकांसाठी केलेल्या योजनांची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांना राख्या बांधल्या. यानंतर शासनाच्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले. धरणगावातील बालकवींच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी योजनेतील लाभार्थी महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.

बहिणींनी येथे बांधलेल्या राख्यांना स्मरून सांगतो, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणी कितीही चुकीचा प्रचार केला, तरी तुम्हाला दिलेले पैसे परत घेणार नाही. राज्याच्या विकासासाठी निधी आणायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला साथ द्या. मतदान हा तुमचा अधिकार आहे. पण, विनंती करेल की महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले……

  • हा तर तुमच्यासाठी माहेरचा आहेर
  • विरोधक सावत्र भाऊ, त्यांच्यापासून सावध राहा
  • विरोधक लेना, तर आम्ही देना बँक. महायुतीचे सरकार देणारे
  • विरोधकांना महायुती झंडू बाम देणार. ‘झंडू बाम, काम तमाम’
  • ताई, माई, अक्का, कपटी सावत्र भावांना मारा बुक्का.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *