विकासकामांचा महापुर!!!!!पुरंदर तालुक्यातील “या” गावाने आकर्षित केले राज्य सरकारला;ग्रामविकास विभागाची सोशल मिडीया टीम गावात

विकासकामांचा महापुर!!!!!पुरंदर तालुक्यातील “या” गावाने आकर्षित केले राज्य सरकारला;ग्रामविकास विभागाची सोशल मिडीया टीम गावात

पुणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला गती देत पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीने विकासाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाची सोशल मीडिया टीम गावात दाखल होऊन पुरंदरचे साहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणी कार्यक्रमात गावातील विविध प्रकल्पांची सखोल तपासणी करण्यात आली.

सोशल मीडिया टीमने गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, गावांतर्गत रस्ते, व्यायामशाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी परसबाग, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी तसेच आरोग्य शिबिर यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

सर्व उपक्रमांत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच सुकलवाडीतील विकास प्रगतिपथावर असल्याचे टीमने विशेष कौतुक केले. यावेळी साहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात व सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते ग्रामस्थांना डस्टबिन तसेच आरोग्य शिबिरामध्ये चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच धनंजय पवार, ह.भ.प. अशोक महाराज पवार, योगेश पवार, दिलीप पवार, प्रतीक्षा चव्हाण, ऊर्मिला पवार, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी चव्हाण, वैजयंता दाते, सुवर्णा चव्हाण, माधुरी दाते, शर्मिला पवार, सुनील भोसले, देवराम सातपुते, साईनाथ चव्हाण आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक सोनल जगदाळे यांनी आभार मानले.

समृद्ध पंचायतराज अभियानामुळे आपल्या गावची ओळख नव्या पातळीवर पोहोचणार असून गावात सुरू असलेल्या विकासकामांना नवीन गती मिळत आहे. सुकलवाडीचे सर्वांगीण विकासस्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ एकजुटीने कार्यरत आहेत.आगामी काळात अधिक दर्जेदार सुविधा गावात उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे.”
– संदेश पवार, सरपंच, सुकलवाडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *