वन्यप्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

वन्यप्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

दिनांक ५/७/२०२१ सोमवार.

“आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. दरवर्षी रोही, हरणं, रानडुक्कर, माकडं यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. यासाठी मदत मिळावी म्हणून शासनाकडे काय प्रयत्न करावेत?

शेतकर्यांचे कायमच रानडुक्कर, हरिण, माकड,ससा या वन्यप्राण्यापांसून शेतीचं, शेतपिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगत असतात.

वन्यप्राण्यांपासून पिकांचंच नाही तर पशुधनाचंही नुकसान होतं. कधीकधी तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होतो.

पंतप्रधान पीक विमा योजना 2021 लागू, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार?

खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार?

तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?

तुमचं जर अशाप्रकारचं नुकसान होत असेल तर तुम्ही नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तो कसा, याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

अर्ज कसा करायचा?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahaforest असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचं MAHARASHTRA FOREST DEPARTMENT या नावाचं एक पेजतुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील Forest Portal या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर MAHARASHTRA FOREST PORTAL नावाचं एक नवीन पेज तिथं ओपन होईल.

इथं सुरुवातीला View Notification of 10 online services, यावर क्लिक केलं, की वन विभागाकडून कोणत्या सेवाऑनलाईन पुरवल्या जात आहेत, त्याची पीडीएफ फाईल ओपन होईल.

यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची भरपाई, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती जखमी किंवामृत झाल्यास आर्थिक सहाय्य तसंच वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई, अशा सेवापुरवल्या जातात.

वन विभाग

त्यानंतर MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील Checklist of required document of 10 online services यावर क्लिक केलं की कोणत्या सेवेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं लागणार याची यादी दिलेली असते.

आता पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया.

MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीतानुकसान भरपाई मंजुर करणे या पाचव्या क्रमांकासमोरील Application Formवर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर यासंबंधीच्या नुकसान भरपाईचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.

इथं सुरुवातीला तुम्हाला नुकसान भरपाईचा प्रकार मनुष्य, शेतपीक, पशुधन यापैकी एक पर्याय निवडायचा आहे आणिमग संबंधित प्रकारानुसार अर्ज भरायचा आहे.

त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. पुढे नुकसानीचा प्रकार (ऊस की इतर पीक) ते निवडायचंआहे. त्यानंतर पिकाचं नाव, शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि वनविभागाचं कार्यालय निवडायचंआहे. त्यानंतर पत्ता आणि घटनेचा दिनांक टाकायचा आहे. सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.

हे सगळं भरून झालं की तुम्हाला ADD या बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्ही नुकताच भरलेला संपूर्ण अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.

वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मंजुर करणे, असं या अर्जाचं शीर्षक आहे आणित्याखाली अर्ज क्रमांक दिलेला आहे.

या पेजवरील सगळ्यांत शेवटी असलेल्या प्रिंट या बटणावर क्लिक करून तुम्ही या अर्जाची प्रिंट काढू शकता.

त्यानंतर हा अर्ज तुमच्या भागातील वनविभागाकडे सबमिट होतो. वनविभागातील वनपाल किंवा वनरक्षक हे तुमच्याकडे नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी येतात. त्यावेळी तुम्हाला चेकलिस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे कागदपत्रं रेडी ठेवावीलागतात.

अर्जाचं स्टेटस कसं पाहायचं?

आता ऑनलाईन अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरीलPublic Services या रकान्यातील RTS Application Tracker या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथं तुम्हाला तुम्ही ज्या प्रकाराअंतर्गत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला आहे, तो प्रकार निवडायचा आहे आणि मगApplication Number (अर्ज क्रमांक) टाकायचा आहे. त्यानंतर समोरील ट्रॅक या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या अर्जाचं स्टेटस प्रक्रिया या पर्यायाखाली नमूद केलेलं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *