वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण.      राष्ट्रतेज प्रतिष्ठानचा माळशिरसमध्ये स्तुत्य उपक्रम

वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण. राष्ट्रतेज प्रतिष्ठानचा माळशिरसमध्ये स्तुत्य उपक्रम

पुरंदर

पुरंदरच्या पूर्व भागातील माळशिरस गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या वतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते माळशिरस गावातील महादेव मंदिर परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब आदीझाडांचे रोपण करण्यात आले.

यावेळी कमल शेंडगे, वनिता बोरावडे, रेखा गद्रे, कल्पना जाधव, सारिका जाधव, नंदिनी गद्रे, सोनाली शेंडगे, पल्लवीआबनावे, सुजाता गोसावी, सुषमा लोखंडे, कल्पना भोसले, पूजा गोसावी, सुशिला गद्रे, लक्ष्मीबाई शेंडगे, स्वाती शेंडगे, निकिता शेंडगे, जयश्री शेंडगे, राजश्री आगवणे आदी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून माळशिरस गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातआहेत. त्यामध्ये स्त्री जन्माचे स्वागत, शिक्षक दिन समारंभ, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी करमणुकीचेकार्यक्रम, माळशिरसभूषण पुरस्कार वितरण, कोरोनामुक्त रुग्णांना कोविड सेंटर मधून घरी जाताना झाडांची रोपे वाटप, सार्वजनिक गणेशोत्सव, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविले जातात. या सर्व कार्यक्रमांमध्ये झाडांची रोपे देण्यात येतातअशा पद्धतीने एक हजारपेक्षा जास्त झाडांची रोपे वाटप आणि रोपण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रतेज प्रतिष्ठानचेसंस्थापक अध्यक्ष माळशिरस ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र भुलाजी गद्रे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी उपसरपंच श्री दिलीप शेंडगे, राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माळशिरसतंटामुक्ती समिती उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गद्रे, मार्गदर्शक श्री रमेश गद्रे, राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माळशिरस ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र भुलाजी गद्रे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सिद्धेश गद्रे, हर्षद बोरावडे, सौरभ गायकवाड, गणेश शेंडगे, महेश गायकवाड, शेखर शेंडगे, शिवम शेंडगे आदी उपस्थित होते.

“राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या माळशिरस गावामध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामपंचायतसदस्य श्री राजेंद्र गद्रे हे सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन पर्यावरण संवर्धन, महिला आणि लहान मुले डोळ्यासमोर वेगवेगळेस्तुत्य उपक्रम राबवितात-सौ. वनिता दादाराव बोरावडे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *