राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ठिकठिकाणी आंदोलने.

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ठिकठिकाणी आंदोलने.


नीरा: आज सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोको आंदोलन केले जात आहेत. आज सकाळी १०.३० वाजता नीरा येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून बैलगाडीत मोटारसायकल व गॅस सिलेंडर घेऊन मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतीकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..


मोदी सरकार हाय हाय!!! महागाई कमी झालीच पाहिजे!!!


या मोदी सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय!!!! या मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. नीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी उत्स्पूतरपणे नियोजन केले. शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या बैलगाडीत मोटारसायकल व घरगुती गॅस सिलेंडर टाकून फेरी काढण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ तेजश्री काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे, माजी ब जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्ता आबा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज भैय्या काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक व न्याय विभाग बापूसाहेब पाटोळे, सरचिटणीस पुरंदर तालुका उमेश चव्हाण, पुरंदर तालुका महिला उपाध्यक्षा कोमल निगडे, राजेश चव्हाण, युवक उपाध्यक्ष पुरंदर तालुका अजित सोनवणे, सरचिटणीस पुरंदर तालुका युवक विष्णू गडदरे, संघटक पुरंदर तालुका संजय दगडे,नीरा शहराध्यक्ष प्रमोद काकडे, नीरा महिला अध्यक्षा सौ तनुजा शहा, नीरा उपाध्यक्ष अजय राऊत, नीरा शहर युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे, सरचिटणीस संतोष मोहिते,ओबीसी अध्यक्ष सुनील पाटोळे, ओबीसी युवक अध्यक्ष नीरा विराज जमदाडे, बाळासाहेब साळुंखे संघटक नीरा शहर, सोशल मीडिया अध्यक्ष नीरा कोळविहरे गण अनिकेत सोनवणे, कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल नीरा मुहम्मद अली मुलाणी,पुरंदर युवक उपाध्यक्ष पंचायत समिती गट राजू देसाई, सरचिटणीस नीरा शहर संतोष मोहिते,चिटणीस नीरा शहर संजय चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,नीरा शहर सोशल मीडिया अध्यक्ष जैद डांगे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *