राज्यपालांवर कारवाई नाही म्हणजे राज्यकर्ते सहमत ; शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच : छत्रपती संभाजीराजे

राज्यपालांवर कारवाई नाही म्हणजे राज्यकर्ते सहमत ; शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच : छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. आठ दिवस उलटले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही.

त्यामुळे संताप व्यक्त होत. त्यातच आता माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या विधानावरून पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

याचा अर्थ त्यांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा सवाल संभाजीराजेंनी विचारला आहे.शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्या विधानावर संभाजीराजे याचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *