राजकीय वर्तुळातील खळबळजनक बातमी!!!!राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” बड्या नेत्याच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

राजकीय वर्तुळातील खळबळजनक बातमी!!!!राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” बड्या नेत्याच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

पुणे

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयातून चालणाऱ्या बनावट भरतीचे धक्कादायक रॅकेट उघड झाल्यानंतर आता माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याचा प्रकार समोर आला होता. साम टीव्हीनं मंत्रालयातील लिपीक भरतीचा घोटाळा उघड केला होता. त्यानंतर दुसरा भरती घोटाळा समोर आला आहे. या लिपिक भरती घोटाळ्यात माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मंत्रालयातील लिपीक भरती घोटाळ्यात गोवंडीमधील एका तरुणाची देखील सात लाखांहून अधिक रुपायाची फसवणूक झाली होती. त्यानंतर या फसवणूक प्रकरणी गोवंडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंत्रालयातील या बोगस लिपिक भरती रॅकेटप्रकरणी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का,याबाबत चौकशी सुरू असल्याचे गोवंडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान,एका प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की,या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही.या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *