“या” ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहताना चुकून खडा लागल्याने केली मारहाण ; वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

“या” ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहताना चुकून खडा लागल्याने केली मारहाण ; वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे

बैलगाडा शर्यत पाहताना मित्राला मारलेला खडा चुकून दुस-या लागल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जवळपास वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बैलगाडा घाट, चर्होली बु, ता. हवेली येथे शनिवारी सायंकाळी ५:०० वा सुमारास हा प्रकार घडला.

मनोज मधुकर मगर (वय २६,रा. चर्होली बु, ता. हवेली) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय पठारे, हर्षल पठारे, अक्षय तापकिर, सोन्या पठारे, गुड्ड्या बुर्डे, विशाल पठारे, काल्या, दिघ्या व १० ते १२ (सर्व रा. चर्होली बु, ता. हवेली ) इसमांविरोधात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज हे त्यांचे दाजी दीपक शिंदे यांच्यासोबत बैलगाडा घाट, चर्होली बु. येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. मनोज यांचे मित्र नेताजी लटोरे यांना खडा मारला तो चुकून आरोपी अक्षय पठारे याला लागला. याबाबत मनोज यांनी पठारे याची माफी मागत खडा चुकून लागल्याचे सांगितले.

पण, आरोपीने वाद घालत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच, दीपक शिंदे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. दोन आरोपींनी शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.

आरोपी सोन्या पठारे याने फिर्यादी यांना गोळ्या घालीन, कुणालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *