मोठी बातमी!!!!!    सुनेत्रा पवार बारामती लोकसभेला कशा हरल्या,निकालाच्या चार महिन्यानंतर विजय शिवतारेंनी सविस्तर सांगितलं!!!!!!

मोठी बातमी!!!!! सुनेत्रा पवार बारामती लोकसभेला कशा हरल्या,निकालाच्या चार महिन्यानंतर विजय शिवतारेंनी सविस्तर सांगितलं!!!!!!

पुणे

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आजही लोकसभा निवडणुकीतील विजय आणि पराजयाची चर्चा होतेय. कारण, विधानसभा निवडणुकांना लोकसभेची पार्श्वभूमी जोडली जात असून त्याच अनुषंगाने विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यात येत आहे.

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर होणार असून विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम होत असून गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची शिकवण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

त्यावरुन, बोलताना शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा निवडणुकांच्या विषयाला हात घातला. तसेच, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचं सविस्तर व पद्धतशीर विश्लेषणही त्यांनी केलंय.लोकसभा निवडणुकांवेळी बंडाच्या भूमिकेत असलेल्या विजय शिवतारेंनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

मी आपल्याला सांगतो, महायुतीच्या नेत्यांनी, माझे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित दादा पवार हे तिघे मिळून जेव्हा निर्णय घेतील, त्यावेळेस पुरंदरमधून विजय शिवतारे आणि विजय शिवतारेच लढणार. म्हणून त्या बाबतीमध्ये त्यांनी जे आदेश दिले ते मी पाळले असे म्हणत उमेदवारीच्या घोषणेची आपण वाट पाहात असल्याचे शिवतारे यांनी म्हटले.

दरम्यान, यावेळी, बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव नेमका कसा झाला, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.शेवटी जनता जनार्दन अंतिम आहे, मला एवढं माहिती होतं की माझी 1 लाख मतं आहेत. ही मतं कुठल्याही परिस्थितीत दादांना द्यायची, ती मतं कुठल्याही परिस्थितीत दादांना द्यायची हे मी ठरवलं, थोडसं कुठंतरी कमी पडलो. थोडीशी सेंटिमेंटल इनकॅशमेंट होती, घरातला प्रश्न असल्यामुळे तो पराभव झाला.

माझ्या मतदारसंघातून लीड नाही मिळालं असं नाही. उदाहरण बघा, आमचे आढळराव पाटील लढले, त्या मतदारसंघात महायुतीचे सगळे आमदार आहेत. पण, लीड नाही मिळाला. एखाद्यावेळेस असं वारं फिरतं. गैरसमज व फेक नेरेटीव्ह पसरले गेले, संविधान बदलणार, आरक्षण घालवून टाकतील, मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं गेलं, असे सविस्तर विश्लेषण विजय शिवतारे यांनी विधानसभा निवडणुकाचं केलंय.

लोकसभेला तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवारांच काम केलं, उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी काम केलं, त्या पद्धतीने अजित पवार गट, अजित पवार हे तुमच्यासाठी काम करतील असं वाटतं का, असा प्रश्न शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मला वाटतं आजचा हा प्रश्नच नाही, असेही उत्तर शिवतारे यांनी दिलं.एक गोष्ट आहे की, काही सेंटिमेंटल भाग आहे, कौटुंबिक भाग आहे त्या बाबतीमध्ये काय होईल त्याच आपण बोलू शकत नाही.

पण, कामाच्या जीवावर महाराष्ट्राची केलेली दोन वर्षातली प्रगती. इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन नवीन योजना, एफडीआयची इन्वेस्टमेंट, लाखो लाखो कोटी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट राज्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी आणल्या आणि म्हणून निश्चितपणे कामाच्या जीवावर ते पुढे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांनी कौतुक केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *