पुणे
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे.दरम्यान त्यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी सरकारच्या ‘लाडकी बहिण’ या योजनेवर टीका केली होती, त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना इशारा दिला होता.
आता मनोज जरांगे पाटील यांनी यावरून दरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.दरेकर मराठे संपवण्यासाठी अभियान राबवणार आहेत. फडणवीस दरेकर यांच्या हातात कासरा देऊ नका, हे तुमचा आणि पक्षाचा गेम करतील. मराठा काही करू शकतात. दरेकर फक्त तुमचे पाडू शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची माणसं निवडून आणतील.
चला तुम्हाला काय करायचं ते करा, मी मरणाला घाबरत नाही. दरेकर म्हणजे नथ नसलेली तमाशातील मावशी आहे. दरेकर डोळे उघडा समुद्राचे पाणी मारा, माझ्या डोक्यात राजकारण नाही. तुमच्या डोक्यात राजकारण आहे, म्हणून आमच्या मागण्या मान्य करीत नाही नाहीत. तुम्ही एका आमदारकीसाठी काहीही करू शकता.
दरेकर तुम्ही आणि सात-आठ जणांनी मराठा क्रांती मोर्चा, मूक मोर्चा संपवला. तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचे मारेकरी बनला अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.