मोठी बातमी !!!!    आधी मंत्रिपदासाठी पत्ता कट;आता शिवसेनेच्या विजय शिवतारेंसमोर नवं संकट..? अडचणी वाढणार…

मोठी बातमी !!!! आधी मंत्रिपदासाठी पत्ता कट;आता शिवसेनेच्या विजय शिवतारेंसमोर नवं संकट..? अडचणी वाढणार…

पुणे

महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पाच माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. यात अब्दुल सत्तार,तानाजी सावंत,दीपक केसरकर,राजेंद्र गावित यांच्यासह विजय शिवतारे यांचा समावेश आहे.यानंतर शिवतारेंनी पक्षाच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती. तसेच आता नाही तर कधीच नाही असा कित्ता गिरवत त्यांनी अडीच वर्षांनंतरचं मंत्रिपद मला नको, असा इशाराही त्यांनी दिला.

आता याच शिवतारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.माजी मंत्री आणि शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या झोपड्या तोडल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच आंदोलन छेडलं आहे.याचवेळी शिवतारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे.त्यामुळे आता शिवतारेंसमोर नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात संबंधित जागा ही आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे. पण या ठिकाणी असलेले घरे,झोपड्या जमीनदोस्त करण्यात आली.येथे वास्तव्याला असलेल्या झोपडीधारकांकडून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.मोबदला न देता फसवणूक केल्याचा झोपडीधारकांचा आरोप आहे.

अंधेरीत विजय शिवतारे बिल्डर हाय हायच्या घोषणांनी दणाणून सोडला. शिवतारे यांनी पदाचा गैरवापर करून गरिबांच्या झोपड्यांवर जेसीबी फिरवल्याचा आरोप केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. पण गरीब झोपडीधारक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहे.

एकीकडे मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिवतारेंविरोधात झोपडीधारकांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *