मृत्यूच्या दाढेतून परतलोय!!!!!!!!बारामती नियतीनं दिलेली असाईनमेंट;विजय शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम,अजितदादांची होणार कोंडी

मृत्यूच्या दाढेतून परतलोय!!!!!!!!बारामती नियतीनं दिलेली असाईनमेंट;विजय शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम,अजितदादांची होणार कोंडी

पुणे

अरे विजय शिवतारे, तू बोलतो किती? तुझा आवाका किती? तू बोलतोय कोणाबरोबर? यंदा तू आमदार कसा होतो तेच बघतो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना थेट आव्हान दिलं.

अजित पवारांनी काँग्रसचे उमेदवार संजय जगताप यांच्या मागे ताकद उभी केली. त्यामुळे दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवतारेंचा पराभव झाला. हा पराभव शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला.आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. शिवतारे शिंदेंच्या शिवसेनेत आहे. पक्ष महायुतीत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीदेखील महायुतीत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला असून इथून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंचं आव्हान असेल. शरद पवार आणि अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. या निवडणुकीत आपण अपक्ष लढणार असल्याची घोषणा सेनेच्या शिवतारेंनी केली आहे.

यामुळे सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.विजय शिवतारे आज बारामती लोकसभेत येणाऱ्या भोरचा दौरा करत आहेत. तिथे जाऊन ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतील. भोरला जात असताना शिवतारेंनी आपण बारामती लढवणारच असल्याचं ठामपणे सांगितलं. ‘मी माघार घेतलेली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ ४१ वर्षे पवार कुटुंबाकडे आहे.

यंदाच्या निवडणुकीत तर मतदारांसमोर दोनच पर्याय आहेत. हे पवार की ते पवार यातूनच मतदारांना निवड करायची आहे. लोकशाहीत असं होता कामा नये,’ असं शिवतारे म्हणाले.गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंना ६ लाख ८६ हजार मतदान झालं. तर भाजपच्या उमेदवाराला साडे पाच लाख मतं पडली.

यावेळी दोन्ही उमेदवार पवारांच्या घरातील आहेत. मग पवारविरोधी मतदारांनी काय करायचं, असा सवाल त्यांनी विचारला. मला बदला घ्यायचा नाही. मी बंड करत नाही. तर मी लोकशाहीतलं माझं कर्तव्य पार पाडत आहे. लोकांना पर्याय उपलब्ध करुन देत आहे, असं शिवतारेंनी सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला युतीधर्म पाळण्यास सांगितलं.

युतीचा खासदार निवडून आला पाहिजे. मोदी-शहांना आपण तसा शब्द दिला आहे, असं शिंदेंनी मला सांगितलं. मोदींवर माझी श्रद्धा आहे. ते राष्ट्रनिष्ठ आहे. पण इथली लढाई वेगळी आहे. मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर घणाघात केला आहे. मी बारामतीत घराणेशाहीविरोधातच लढतोय, असं शिवतारे म्हणाले.अजित पवार पालकमंत्री असताना मी पाण्यासाठी उपोषण करत होतो.

९ दिवस मी उपोषण केलं. पण अजित पवारांनी लक्ष दिलं नाही. मेला तर मरु दे अशी त्यांची भूमिका होती. त्यांना प्रचंड गुर्मी आहे. त्या उपोषणामुळे माझी किडनी गेली. माझ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. मी मृत्यूच्या दारातून परतलो. त्यामुळे बारामतीत पवारांचा पराभव ही नियतीनं मला दिलेली असाईनमेंट आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *