मुळशीत अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : बाळासाहेब चांदेरे

मुळशीत अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : बाळासाहेब चांदेरे

मुळशी

आपल्या दैदीप्यमान जीवनकार्याने स्त्री जन्माची महानता सिद्ध करणाऱ्या भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रजातहितदक्ष ,न्यायप्रिय राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती भोर-वेल्हा-मुळशी सकल धनगर समाजाच्या वतीने पौड येथे आयोजित करण्यात आली. अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी (अहिल्यानगर) ते पौड अशी 200 किमी पायी प्रेरणा ज्योत आणण्यात आली, चौंडीवरून आणलेली प्रेरणा ज्योत व अहिल्यादेवींच्या पुतळ्याची अश्वारूढ रथातून मिरवणूक विठ्ठलवाडी फाटा ते पौड बस स्थानक, पंचायत समिती, तहसीलदार कचेरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व मानवंदना करून मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेविंच्या नावाने घोषणा देत भंडारा उधळत समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मीरवणुकी दरम्यान धनगर बांधवांनी पौड बस स्थानकाच्या पटांगणात पारंपारिक अप्रतिम गजा नृत्य सादर करत, फुगड्या खेळत, अहिल्यादेवींची गाणी आणि धनगरी ओव्या म्हणत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पिडीसीसी बँकेच्या सभागृहात सर्व महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख व माजी सभापती बाळासाहेब चांदरे होते.

यावेळी चांदेरे म्हणाले मुळशीतील दुर्गम डोंगरी वाड्यावस्त्यांवर तेथील मूलभूत सुविधांसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू व तालुक्याच्या ठिकाणी पौड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे अशी समाजाची मागणी आहे तो प्रश्न शासन दरबारी आवश्यक त्या परवानग्या घेऊन मार्गी लावू. तर शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर म्हणाले की अनेक वर्ष प्रलंबित असलेले धनगर समाजाचे पौड येथील सभागृहाचे काम आवश्यक ती मदत करून पूर्ण करू असे आश्वासन दिले. यावेळी पिडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ चांदेरे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब झोरे,वेल्हा तालुका युवक कार्याध्यक्ष शंकर ढेबे यांनी मनोगत व्यक्त केले.

व्याख्याते प्राध्यापक सुनील धनगर, प्राध्यापक प्रवीण माने व कुमारी प्रांजल कचरे यांची अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्याने झाली.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते शांतारामदादा इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कंधारे, माजी सभापती कोमल वाशिवले, ज्येष्ठ नेते धुळाभाऊ कोकरे, मुख्याध्यापक किसन गोरे सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष दादा मोहोळ,तालुका प्रमुख सचिन खैरे भाजपा तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ,वेल्हा तालुका भाजपा नेते सुनील जागडे, शुषमाताई जागडे,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष दिपाली कोकरे, भाजपा महिला अध्यक्षा अलका ववले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार पवळे, पैलवान विक्रम पवळे, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष शंकर मरगळे, म्हसोबा देवस्थानचे विश्वस्त संभाजी गावडे, युवासेना तालुकाप्रमुख दत्ता झोरे,टेमघर चे सरपंच सचिन मरगळे,मा.सरपंच महादेव मरगळे, उद्योजक नामदेव हिरवे, पत्रकार व यशवंत सेना वेल्हा तालुका अध्यक्ष शंकर ढेबे,मुख्याध्यापक रामचंद्र गोरे सर, विंझाई देवी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब गोरे सर, दासवेचे उपसरपंच मारुती मरगळे, अनिल मरगळे, रासपचे भाऊ आखाडे, संतोष बावधने, सरपंच चंद्रभागा ढेबे, माजी सरपंच रमेश मरगळे, सरपंच बाळासाहेब मरगळे, सरपंच मथुराम डोईफोडे, उपसरपंच दत्ता मरगळे, उद्योजक नानासाहेब मरगळे, युवा नेते तुकाराम कोकरे, ग्रामपंचायत सदस्य अनंता मरगळे, प्रकाश मरगळे, राम कोकरे, पांडुरंग ढेबे, रामभाऊ झिंगु ढेबे, अंकुश ढेबे, राम जानकर,चेतन आखाडे,रामभाऊ ढेबे,संजय कोकरे,अक्षय मरगळे,सुनील मरगळे, सुनील आखाडे, लक्ष्मण ढेबे, प्रदीप ढेबे, माऊली झोरे, कुंडलिक कात्रट, सिद्धेश्वर गोरे, यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्याप्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश आखाडे, उमेश गोरे, धनाजी आखाडे, अशोक मरगळे, पांडुरंग ढेबे, बबन ढेबे,शिवाजी मरगळे, दत्ता मरगळे, यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वेगरेचे माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांनी तर आभार शिरकोलीचे माजी उपसरपंच मारुती मरगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *