मुदगल/मोगरी फिरवीणे पारंपरिक व आधुनिक व्यायामप्रकार

मुदगल/मोगरी फिरवीणे पारंपरिक व आधुनिक व्यायामप्रकार

भारतीय व्यायामशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान

पुणे

निखिल जगताप बेलसर

भारतीय मल्लविद्येच्या जडणघडणीत अनेक पारंपारिक व्यायामप्रकार सांगितले आहे.आजच्या अत्याधुनिक व्यायामशाळेची पाळेमुळे ही मल्लविद्येच्या व्यायामशास्त्रात फारपूर्वीपासून प्रचलित आहेत.भारतीय व्यायामशास्त्र हे केवळ अंगमेहनतीवर अवलंबून आहे.या व्यायामासाठी आपल्याला एकही रुपया खर्चावा लागत नाही.जिथे असाल तिथून सुरवात करू शकणारा व्यायामप्रकार म्हणजे भारतीय व्यायामशास्त्र.त्यातील बाह्य वस्तूंचा वापर करून स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी जे व्यायाम अस्तित्वात आले.

मुदगल/मोगरी फिरवणे हा एक व्यायामप्रकार महत्वाचा मानला जातो.मुदगल अथवा मोगरी किंवा काही ठिकाणी गदा फिरवणे असेही याचे उच्चार पहायला मिळतात.मोगरी अथवा मुदगल ही मुळात युद्धशास्त्रातील शस्त्र होय.फार दूरवर न जाता शिवकालीन युद्धशास्त्रात जो गुर्ज वापरला जात असे तो गुर्ज म्हणजे मोगरीचे रुप होय.फरक इतकाच की गुर्ज पोलादी असून त्याच्या पुढे पोलादी व धारदार पाकळ्या असतात. समोरासमोर केल्या जाणाऱ्या हातघाईच्या युद्धात प्रतिपक्षाच्या पायदळाच्या डोक्यावर असणारे शिरस्त्राण अर्थात हेल्मेट फोडणे हा या शस्त्राचा प्रमुख उपयोग होय.

शिवकाळात गावोगावी असणाऱ्या तालमी म्हणजे जणू युद्ध प्रशिक्षण केंद्रे असायची.यात जवान कुस्ती व इतर युद्धाला पूरक व्यायामप्रकार करायचे व त्यातील लाकडी मोगरी फिरवून गुर्जाचा अभ्यास करायचे.कालांतराने 1857 च्या व्यापक उठावानंतर ब्रिटिशांनी तालमीत असणारी हत्यारे नामशेष केली.

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील रहिवाशी विशाल उर्फ भाऊसाहेब जगताप यांचा वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय असून त्यांच्या अनेक पिढ्या हाच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे ते स्वतः यात व्यवसाय आहेत.कोरोनाच्या काळात हॉटेल व्यवसाय संकटात सापडल्यामुळे ते स्वतःपैलवान असल्यामुळे अनेक पैलवान मंडळी मित्र असल्यामुळे त्यांच्या डोक्यात विचार आला की पैलवान मंडळींसाठी आपण मुदगल(मोगरी) विक्री करू त्यातून थोडे फार पैसे पण भेटतील.

तरुण वर्गाचा मोबाईचा भरपूर वापराचा वाढता कल व व्ययामाला प्रोत्साहन मिळेल.मुदगल हॉटेल वर ठेवले असता अनेकांनी त्याची मागणी केली.त्याप्रमाणे ते बनवत गेले.काही दिवसातच विक्रमी विक्री झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेज समोर मुलांसाठी रस्त्यावर स्टॉल लावला.तिथेही उत्तम प्रतिसाद मिळाला. आजवर काम करत असताना जो आनंद मिळाला नाही तो मुदगलची विक्री करताना आला कारण अनेक पैलवान आणि वस्तादांशी संपर्क येतो व तरुण पिढी बलशाली व्हावी यासाठी माझा हातभार लागत आहे. या साठी त्यांचे मित्र जाबीर मुजावर साथ मिळाली..ही भावना ते बोलून दाखवतात..

मुदगल/मोगरी फिरवीण्याचे फायदे

मजबूत शरीर यष्टी

शरीराला बळकटी मिळते

अनेक रोगांपासून संरक्षण

पिळदार शरीरयष्टीस उपयुक्त

स्नायूंची ताकद वाढते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *