मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना हृदय विकाराचा तीव्र झटका;अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यु

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना हृदय विकाराचा तीव्र झटका;अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यु

पुणे

लापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी सेविकेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फॉर्म भरताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. वाळूज देगाव येथील सुरेखा रमेश आतकरे (वय ४८) यांचा मृत्यू झाला.सुरेखा आतकरे यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

देगाव (वा) येथील अंगणवाडी क्रमांक: १ येथे शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम करत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.सुरेखा आतकरे याना अंगणवाडी सेविकेची ड्युटी बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. सुरेखा यांचे निधन झाल्याने मोहोळ गावातील वाळूज देगाव गावावर शोककळा पसरली आहे.

सुरेखा आतकरे यांचा स्वभाव अत्यंत सृजनशील आणि शांत स्वभावाच्या होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शासनाकडून या निराधार झालेल्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वाळूज देगाव येथील ग्रामस्थांमधून होत आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व गावात अंगणवाडी सेविकांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरून घेण्याची जबाबदारी आली आहे. अंगणवाडी सेविका या सर्वे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जबाबदारी दिलेली आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून ‘नारी दूत’ या अॅपवरून फॉर्म भरून देत आहेत.मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज)येथील अंगणवाडी क्रमांक : १ येथे सुरेखा आतकरे या अंगणवाडी सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र आला.

सुरेखा आतकरे खुर्चीवरून खाली कोसळल्या.अंगणवाडी मधील मदतनीस या किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या. जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खूर्ची वरून खाली निपचीत पडल्याचे मदतनीसला दिसले. सुरेखा आतकरे यांना तत्काळ मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.शासकीय डॉक्टरांनी तपासणी करून सुरेखा आतकरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *