मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा

मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा

पुणे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार, असं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या या घोषणेमुळे महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.अगदी दोन दिवसापूर्वीच एका महिला मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पवारांना बारामतीतून पाडा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले होते. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज द्यावी, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

याबाबत शिंदे गटाने विजय शिवतारे यांना समज देखील दिली होती. मात्र, तरी देखील शिवतारे बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम होते. दरम्यान, शिवतारे यांनी बुधवारी (ता.१३) सासवडमध्ये तातडीने आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *