मीटर नाही आणि‌ महावितरणने पाठविले वीजबिल ; मग काय भिक मांगो आंदोलन करत अभियंत्यांना दिले बिलाचे पैसे

मीटर नाही आणि‌ महावितरणने पाठविले वीजबिल ; मग काय भिक मांगो आंदोलन करत अभियंत्यांना दिले बिलाचे पैसे

अमरावती

महावितरणकडून अमरावती शहरातील वडाळी परिसरात राहणाऱ्या रविन्द्र डोंगरे या वीज ग्राहकाला मीटर नसताना १ हजार ६०० रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. यामुळे प्रहार जनशक्‍तीतर्फे भिक मांगो आंदोलन करत बिलाचे पैसे दिले.

घरी वीज मीटर नसताना आलेले वीज बिल पाहून रवींद्र डोंगरे या ग्राहकास धक्काच बसला. त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भिक मांगो आंदोलन करत पैसे गोळा केले.

गोळा झालेले पैसे अभियंताकडे सुपूर्त केले व बिल कशाच्या आधारावर आले? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यामुळे महावितरणने कोणत्या आधारावर वीज बिल दिले? असा प्रश्न उपस्थित होत असून, या घटनेमुळे महावितरणचा शहरातील भोंगळ कारभार उघड झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *