माणुसकीला काळीमा फासणारी घटना !!!! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले,पत्नीचा जागीच मृत्यु।

माणुसकीला काळीमा फासणारी घटना !!!! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले,पत्नीचा जागीच मृत्यु।

मुंबई

वसई येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. वसई रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलून दोन मुलांसोबत पलायन केले आहे.

या गंभीर घटनेमुळं महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. आज सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना पतीने तिला अचानक जागे केले. त्याचवेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनखाली पतीने पत्नीला ढकलून दिले.

त्यानंतर दोन्ही मुलांसोबत सदर इसमाने पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या क्रूर घटनेबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *