महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !!!! तरुणांकडून एसटी बस अडवून महाविद्यालयीन तरुणींची छेड

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !!!! तरुणांकडून एसटी बस अडवून महाविद्यालयीन तरुणींची छेड

हिंगोली

हिंगोलीत एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेड काढल्याच्या प्रकारानंतर हिंगोलीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे हिंगोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनात धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हिंगोलीतील औंढा राष्ट्रीय महामार्गावरील दिग्रस पाटील येथे महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची बस अडवून तरुणांनी ही छेड काढल्याची माहिती तरुणींनी पोलिसांत दिली आहे.या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात हजर होत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या घटनेने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात देखील खळबळ उडाली आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आहे.

नागरिकांकडून आरोपींच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत. हिंगोली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर स्वतः पोलीस तालुक्यात दाखल झाले असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *