महिला दिनाचे औचित्य साधुन पुरंदरमधील “या” ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवत केला ज्येष्ठ नागरिकांचा सपत्निक सत्कार

महिला दिनाचे औचित्य साधुन पुरंदरमधील “या” ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवत केला ज्येष्ठ नागरिकांचा सपत्निक सत्कार

पुरंदर

आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वाघापूर ग्रामपंचायत मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर सर्व महिलांना योजनांची माहिती देण्यात आली त्याचबरोबर महिलांची बीपी शुगर तपासणी घेण्यात आली कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व महिलांनी आपले मत व्यक्त केले.

महिला दिनाचे औचित्य साधून सर्वात महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम झाला तो म्हणजे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिक यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला खूप सुंदर अशा प्रकारे सर्व कार्यक्रम पार पडला.

विशेष म्हणजे आज कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पुरुषांनी स्वतः खाली बसून फक्त महिलांसाठी खुर्च्या ठेवल्या अतिशय आनंदात कार्यक्रम पार पडला उपस्थितांचे ग्रामपंचायतीकडुन मनापासून आभार माणण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *