महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजवाहक तारेचा धक्का बसुन एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यु

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजवाहक तारेचा धक्का बसुन एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यु

अहमदनगर

वीजवाहक तारेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील चार बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येणाऱ्या वांदरकडा येथे आज घडली आहे. या घटनेमुळे बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सदर वीजवाहक तार गेल्या चार दिवसांपासून तुटली आहे. मात्र महावितरण याकडे वेळीच लक्ष न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वांदरकडा परिसरात अजित बर्डे आणि अरुण बर्डे हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह राहतात. बर्डे कुटुंबीय मोलमजुरी करुन आपले उदरनिर्वाह चावलतात. दोन्ही अजित बर्डे यांना 8 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असे दोन मुलगे होते, तर अरुण बर्डे यांना 12 वर्षे आणि 10 वर्षाचे दोन मुलगे होते. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ही चारही मुलं घराजवळ खेळत होती. जवळच असलेल्या नाल्याजवळ मुले खेळत होती. खेळता असतानाच नाल्याजवळ असलेल्या वीजवाहक तारेचा मुलांना धक्का लागला आणि तारही मुले जागीच ठार झाली.

याबाबत घारगाव पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले. गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक नेते, वायरमन, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *