महाराष्ट्र हादरवणारी बातमी!!!!!!!!!!!!!! मनोज जरांगेंना विरोध करणाऱ्या “या” महाराजांची  कार पंढरीत जळाली;आषाढी एकादशीलाच घडली घटना

महाराष्ट्र हादरवणारी बातमी!!!!!!!!!!!!!! मनोज जरांगेंना विरोध करणाऱ्या “या” महाराजांची कार पंढरीत जळाली;आषाढी एकादशीलाच घडली घटना

पुणे

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज यांना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडिओ महाराज यांनी फेसबूक लाईव्ह करून सोशल मिडियावर शेअर केला होता.

यानंतर महाराज पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आपली एमएच १२ बीपी २००१ ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या ६५ एकर येथील भक्तिसागर येथे पार्क करून ते स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर काल एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.

यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, या घटनेत १ लाखाचे नुकसान झाल्याचंही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितलं आहे. यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात एक समर्थक थेट बारस्कर यांना शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं दिसत आहे.

”पंढरपूरमध्ये ये तुला मारतो, जाळतो”, अशा धमक्यांचा फोन त्यांना आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकारामुळे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची कार जळाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आता पोलीस परिसरात असणारे सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे चौकशी करत आहेत.

ही कार जळाली की जाळली गेली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चांगलेच चर्चेत आले होते. अजय बारस्कर यांची कार पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे.

तब्बल भल्यामोठ्या असलेल्या ६५ एकरमध्ये उभी असलेली अजय महाराज बारस्कर यांची कार जळाली. अजय महाराज बारस्कर यांची कार जळाल्याच्या घटनेचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असेल. बारस्कर यांची कार जळाली की जाणूनबुजून जाळण्यात आली? याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *