महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी !!!!!!                                               देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी !!!!!! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?

पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. आधी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हीच वेळ आली. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष आणखीच वाढला आहे.

मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हं आहे.कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांबाबत अशी काही सूचक विधानं केली आहे, की ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे फडणवीस आणि ठाकरे यांनी अचानक एकमेकांबाबत सूचक विधानं केल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *