मला गांजाची शेती करण्यास परवानगी मिळावी !!!! शेतकर्याचा ग्रामसभेत अर्ज , ग्रामसभेने स्वीकारला

मला गांजाची शेती करण्यास परवानगी मिळावी !!!! शेतकर्याचा ग्रामसभेत अर्ज , ग्रामसभेने स्वीकारला

चंद्रपुर

जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि धान शेती सडल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे. कुटुंब पालनपोषणासाठी शासनाकडून मदत मिळत नसल्याने गांजा शेतीची परवानगी त्याने मागितली आहे. तहसीलदार-कृषी विभाग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याने हा विनंती अर्ज पाठविला आहे. ग्रामसभेने या अर्जासंदर्भात अर्ज स्वीकारत कायदेशीर बाजू तपासून प्रकरण निकाली काढू, अशी माहिती दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नूकसानग्रस्त शेतकर्‍याने सरकारला विचित्रच विनवणी केली आहे. आपल्या 2 एकर शेतीत सतत नुकसान होत असल्याने गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी साईनाथ फुलमारे यांनी डोंगरगाव ग्रामसभेत यासाठी थेट अर्जच सादर केला आहे. गांजा शेती करु देण्याचा विनंती करणारा अर्ज त्याने शेतीच्या विपरीत परिस्थितीमूळे घेतला आहे.

राज्यासह देश आणि जगावर कोरोनाचं संकट आहे. या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं. पण राज्यात आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडंच मोडलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. पण त्यांच्यापर्यंत जोपर्यंत मदत मिळेल तोपर्यंत काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतोय.

अशा परिस्थितीत उद्विग्नतेतून चंद्रपुरच्या एका शेतकऱ्याने सरकारकडे थेट गांज्याची शेती करण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्याने ग्रामसभा, तहसीलदारांना याबाबतचा अर्ज देखील दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याच्या या मागणीची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *