मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे का? अशी चिठ्ठी लिहून घरातील विजेच्या तारांना पकडुन युवकाने संपवले जीवन

मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे का? अशी चिठ्ठी लिहून घरातील विजेच्या तारांना पकडुन युवकाने संपवले जीवन

पुणे

माझं उच्च शिक्षण होऊनही नोकरी मिळत आणि माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. माझा जन्म मराठा समाजात झाला हा गुन्हा झाला काय? अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आदिनाथ राखोंडे (वय २७) तरुणाने टोकाचे पाऊल उचलत चक्क घरात असलेल्या विजेच्या तारांना धरुन आपले जीवन संपवले. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आदिनाथ गोविंदराव राखोंडे हा मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग घेत होता. मराठा आरक्षण मिळत नसल्याने तो हतबल झाला होता. मागील कित्येक दिवसा पासून अस्वस्थ झालेला होता त्यामुळे त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्रीला घरी कोणी नसताना खिशात चिठ्ठी ठेऊन विजेच्या तारेला पकडून आपल जीवन संपवले आहे.

काही वेळातच शेजारच्या लक्षात आल्यावर आदिनाथ यांना तातडीने उपचारासाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.आत्महत्या करण्यापूर्वी आदिनाथने “एक मराठा लाख मराठा मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही.

माझे उच्च शिक्षण होऊन सुद्धा मला नोकरी मिळत नाही माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे, अशी चिठ्ठी लिहून त्याने आपलं जीवन संपवले.

या घटनेची माहिती मिळतच हट्टा पोलीस स्टेशन साहेब पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. मयत आदिनाथ यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *