भोर विभाग महावितरणची आढावा बैठक संपन्न

भोर विभाग महावितरणची आढावा बैठक संपन्न

भोर

संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील ज्या गावांत महावितरणचे नुकसान झाले आहे तसेच इतर काही गावांबद्दल अडचणी आहेत, त्यासंदर्भात भोर शहर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये भोर तालुक्यातील रोहिड खोरे, हिरडस मावळ विशेष करून ४० गाव खोऱ्यातील अतिवृष्टीने झालेल्या महावितरणच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली व आढावा घेण्यात आला.
या परिसरातील साळुंगण येथे भूस्खलन होऊन तर राजीवडी, उंबर्डे, धानवली, कंकवाडी तसेच वरंधा घाटातील अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आणि रस्ते वाहून गेल्यामुळे संपर्क तुटला होता.
अतिवृष्टीमुळे या सर्व ठिकाणी विजेचे खांब आणि लाईन पडल्यामुळे तसेच ट्रांसफॉर्मर खराब झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता, त्यातील काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून इतर राहीलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उद्या व परवा महावितरणची विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासोबतच महावितरणच्या किकवी उपविभागातील गुणंद, न्हावी १५ या गावांतील महावितरणच्या काही प्रलंबित कामांवर चर्चा होऊन ती मार्गी लावण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावांत पाणीपुरवठा योजना व स्ट्रीट लाईटच्या वीजबिलांसदर्भात तक्रारी होत्या, त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीला बारामती लोकसभा मतदारसंघाचे महावितरणचे समन्वयक प्रविनजी शिंदे, पीडीसीसी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, पं.स. सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहू शेलार, शहराध्यक्ष नितीन धारणे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बांदल, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, बारामती लो. युवक अध्यक्ष स्वप्निल कोंडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष राजेश खोपडे, भोर विधानसभा युवक मा.अध्यक्ष मनोज खोपडे, महिला शहराध्यक्षा हसिना शेख, धनंजय जगताप, पांडुरंग निगडे, पत्रकार सारंग शेटे, संदीप खाटपे, तुषार किंद्रे विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण तसेच सचिन राऊत, योगेश नायकवडी, सचिन कुलकर्णी, संदीप गादे, राजेंद्र इंगळे, सचिन साबळे, रत्नदीप करे, सागर पवार आदी अधिकारीही उपस्थित होते.
पंचायत समितीचे बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *