भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलात तर पुन्हा शाई फेकू अशी धमकी; घरूनच दिली विजयस्तंभास मानवंदना

भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलात तर पुन्हा शाई फेकू अशी धमकी; घरूनच दिली विजयस्तंभास मानवंदना

पुणे

कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त आज लाखो भीम अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विजयस्तंभाला घरूनच अभिवादन केले आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पत्र पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाटलांनी कोरेगाव भीमा येथे न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसचे विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या १०० कोटी निधीची अंमलबजावणी करणार, असे त्यांनी सांगितले.शौर्य दिनाच्या निमीत्ताने, दिनांक एक जानेवारीला युध्दात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो. सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे. कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन. शौर्य दिनाच्या निमीत्ताने मानवंदना देण्यास अभिवादन करण्यास भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देता यावी तसेच येणाऱ्यांना अतिशय श्रद्धेने विजयस्तंभास मानवंदना देता यावी, दर्शन घेता यावे यासाठी सरकारने सर्व सुविधा उभारल्या आहेत. त्या क्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही देण्याचे शासनाने निश्चित केले आहे, असे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांवरील एका वक्तव्याने त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. यावर त्यांनी म्हटले आहे की, ” मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती, आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगावला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठया प्रमाणात माझ्या माता भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणान्यांचा मनसुबा मी पुर्ण होऊ देणार नाही.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *