भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल;”या” नेत्याने दिला इशारा

भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल;”या” नेत्याने दिला इशारा

पुणे

कोरेगाव भीमा येथील १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला करणी सेनेनं विरोध केल्यानं नवा वादाला तोंड फुटलं आहे. शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला आहे. ‘करनी सेना भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास त्यांचा खिमा होईल, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी करनी सेनेच्या मागणीचा खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘भीमा कोरेगावचा इतिहास माहित नाही त्यांनी वक्तव्य करू नये. या प्रकारची विधान करून समाजातील कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. बाहेर राज्यात बसलेल्यांनी महाराष्ट्रातल्या विषयावर चर्चा करू नये’.जे पेशवे करू शकले नाही आणि हा काय करणार. आमच्या हक्काचा आणि शौर्याचा दिवस आहे. करनी सेना आणि फर्निसेना यांनी येऊन दाखवावं. करनी सेना नाही ही पळपुटी सेना आहे. भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *