भाविकांनो !!!!!!!!         मांढरदेवी काळुबाईच्या यात्रेला निघालात;कसा असेल मार्ग,जाणुन घ्या वाहतूकीतील बदल

भाविकांनो !!!!!!!! मांढरदेवी काळुबाईच्या यात्रेला निघालात;कसा असेल मार्ग,जाणुन घ्या वाहतूकीतील बदल

पुणे

वाई तालुक्यातील श्री क्षेत्र मांढरदेव येथील ‍श्री काळेश्‍वरी देवीच्या यात्रेनिमित्त सातारा पाेलिस जिल्हा दलाने 24 जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत वाई शहरातील वाहतुक व्यवस्थेत काही अंशी बदल केला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतेच जारी केलेत.

दरम्यान मांढरदेव गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने ‍श्री काळेश्‍वरी देवीचे मंदिर १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते. या काळात भाविकांची गडावर माेठी गर्दी असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गड आणि परिसरात विकासकामे सुरु आहेत. मांढरदेव येथील काळूबाईची वार्षिक यात्रा 24 ते 26 जानेवारी या कालावधीत आहे.

यात्रा काळात भाविकांना साेयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाची नुकतीच वाई शहरात बैठक झाली. यंदा 25 जानेवारीस यात्रेचा मुख्य दिवस असून या निमित्त राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील भाविक गडावर येत असतात. यात्रा काळात वाई शहरात वाहतुक काेंडींची समस्या निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस दलाने 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात वाहतुक व्यवस्थेत बदल केला आहे.

वाईतून मांढरदेव गडासाठी एकेरी मार्ग

जाणारा मार्ग – किसनवीर चाैक – पी. आर. सायकल मार्ट – ग्रामीण रुग्णालय – दातार हाॅस्पीटल – चावडी चाैक – सूर्यवंशी चाैक ते एमआयडीसी – मांढरदेव गड.

येणारा मार्ग – एमआयडीसी मार्गे सूर्यवंशी चाैक – जामा मशिद – फुलेनगरकडे जाणार मार्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *