भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; कार थेट ३० फूट खड्ड्यात कोसळली, थरकाप उडवणारी घटना!!!!

भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; कार थेट ३० फूट खड्ड्यात कोसळली, थरकाप उडवणारी घटना!!!!

पुणे

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार थेट 30 फूट खड्ड्यात कोसळलीसुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाल्याची माहिती आहे. या चौघांनाही उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी (24 डिसेंबर) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

जेव्हा ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेत आमदार जयकुमार गोरे किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर 2 दोघे किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं आहे.

आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक किरकोळ जखमी आहेत. दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जयकुमार गोरे यांची गाडी खड्ड्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *