भाजपने राज्यपालांकडून जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी बदनामी करून घेतली;राज्यपाल भवन हे “भाजप भवन” झालं होतं,महाराष्ट्र पापातून मुक्त झाला

भाजपने राज्यपालांकडून जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी बदनामी करून घेतली;राज्यपाल भवन हे “भाजप भवन” झालं होतं,महाराष्ट्र पापातून मुक्त झाला

पुणे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.राज्यपाल भवन हे ‘भाजप भवन’ झालं होतं, महाराष्ट्र पापातून मुक्त झाला, अशा शब्दात नाना पटोलेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाना पटोले म्हणाले की भाजपने राज्यपालांकडून जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी बदनामी करून घेतली महापुरुषांबाबत टिंगल आणि वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल करत होते. भारतीय जनता पार्टीने राज्याची बदनामी करण्यासाठी मुद्दाम असे राज्यपाल बसवले होते. राज्यपालांनी केलेल्या अपमानाचा बदला महाराष्ट्र कसा घेईल,”असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *