भांडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निलम संदीप दोरगे बिनविरोध

भांडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निलम संदीप दोरगे बिनविरोध

दौंड

दोंड तालुक्यातील भांडगावच्या उपसरपंचपदी निलम संदिप दोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तत्कालीन उपसरपंच रुपाली खळदकर यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणुक घेण्यात आली.

उपसरपंच पदासाठी निलम दोरगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी सरपंच संतोष दोरगे यांनी घोषित केले.

यावेळी पंचायत समिती दौंडचे मा.सभापती मधुकर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य काटकर दादा,काँग्रेस अध्यक्ष विठ्ठलराव दोरगे, मा.उपसभापती नितिन दोरगे, भाऊबापू दोरगे,रवींद्र जाधव, राहुल खळदकर,अमित दोरगे,शंकर हरपळे,विजय दोरगे,अशोक दोरगे,दादा टेळे, प्रमोद दोरगे,सदिप दोरगे,ग्रामविकास आधीकारी जगताप व सर्व ग्रामपंचायत सदस्य व भांडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *