भयानक!!!!!             पुणे जिल्ह्यातील रहिवाशी वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेत केली आत्महत्या

भयानक!!!!! पुणे जिल्ह्यातील रहिवाशी वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेत केली आत्महत्या

पुणे

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याच समोर आलं आहे. या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे , दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजानन रोकडे व पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. या घटनेने वारणवाडीसह पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *