बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गर्लफ्रेंडनं गाठलं, केस धरून बेदम बदडलं

बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गर्लफ्रेंडनं गाठलं, केस धरून बेदम बदडलं

मुंबई

विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्विस रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. विक्रोळीच्या सर्विस रोडवर संध्याकाळी प्रेमी युगुलांचा राबता असतो. याच ठिकाणी, एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी गाठलं. पुढे तिला बॉय फ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करत बेदम मारहाण केली. 

अखेर त्यांच्याच मैत्रिणींनी मध्यस्थी करून तिची या दोन तरुणींकडून सुटका केली. मुलींमध्ये प्रियकरावरून झालेली हाणामारी पाहून अनेकांना धक्काच बसत आहे. प्रेमप्रकरणामध्ये निर्माण झालेल्या वादळातून अखेर ती परिस्थिती ओढावली आणि प्रेयसीनं मैत्रीणीचीच मदत घेत प्रियकरासोबत असणाऱ्या या भलत्याच मुलीला मारहाण केली.

औरंदाबादमध्ये पतीसोबत त्याच्या प्रेयसीला एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीनी तिला जबर मारहाण केली. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी विक्रोळीमध्ये जवळपास अशीच घटना घडल्याचं दिसून आलं.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *