बेलसर येथे वाळू माफियांवर कारवाई गावच्या ग्रामपंचायत व तरुणांनी दाखवले प्रसंगावधान

बेलसर येथे वाळू माफियांवर कारवाई गावच्या ग्रामपंचायत व तरुणांनी दाखवले प्रसंगावधान

बेलसर प्रतिनिधि निखील जगताप

बेलसर गावातील ग्रामस्थांनी कऱ्हा नदीपात्रामध्ये बुधवार (दि.22) रोजी वाळू काढण्यासाठी एक जेसीबी मशीन व कार आली आहे याबाबतची माहिती जेजुरी पोलीस ठाण्यात कळवली. तात्काळ जेजुरी पोलीस ठाणे कडील रात्र गस्तीवर असणारे संदीप मोकाशी व पोलीस चालक भानुदास सरक तात्काळ त्या ठिकाणी गेले व जेसीपी व जीप पोलीस ठाण्यास घेऊन आले.नदीपात्रामध्ये गावातील तरुण सहकारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून पाठलाग करुन सदर मुद्देमाल पोलिस प्रशासनास पकडुन दिला. पोलीस ठाण्यास आणल्यानंतर काल सदर जेसीपी हा वाळू काढण्यासाठी आला होता का? याबाबत खात्री करण्यात आली व तशी खात्री झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

आरोपी मजकूर याने त्यांच्याकडील जेसीबी वाहन नंबर GJ 34 /S/0837 आरसी बुक वर नंबर MH:12:PK:3097 तसेच 150000  रुपये किमतीची एक लाल रंगाची स्विफ्ट कार तिचा नंबर MH:02:AQ:3031 अशी वाहने एकूण किंमत 350000 रुपये चि वाहनाने  नदीपात्रातील दोन ब्रास वाळू उत्खनन करून किंमत रुपये 20000 रुपये ची वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला.

या गुन्ह्यात आरोपी नामे सोमनाथ रामराव जगताप जेसीपी मालक वय 28 वर्ष राहणार मावडी क प ता पुरंदर जि पुणे व मंगेश विठ्ठल हरपळे वय 26 वर्ष मोरगाव रोड जेजुरी ता पुरंदर जि पुणे यांना  अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये वीस हजार रुपयाची वाळू व जवळजवळ दहा लाखाचा जेसीबी व दोन लाखाची कार जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस हवालदार संदीप कारंडे पोलीस नाईक धर्मराज खांडे पोलीस नाईक तात्या खाडे हे करत आहेत.

बेलसर गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने सदर वाळू चोरी पकडून दिले आहे.कऱ्हा नदीपात्रामध्ये वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाली असता ग्रामस्थांकडून नदीपात्रामध्ये जाऊन उपलब्ध गाड्या पकडण्यात आल्या. बेलसर येथील कऱ्हा नदीपात्रातील कणभरही वाळू चोरीस जाऊन देणार नाही त्यासोबतच वाळू चोरी मुळे बेलसर परिसरातील पाणी पातळी खालावू शकते त्यामुळे वाळू चोरीच्या बाबतीत निश्चित ग्रामपंचायत प्रशासन सक्रिय राहणार असल्याची माहिती उपसरपंच धीरज जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *