बाल मृदंगचार्य तेजस गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन !!!!!!

बाल मृदंगचार्य तेजस गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन !!!!!!

केडगाव येथील बाल मृदंगाचार्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.तेजस एकनाथ गायकवाड (वय १४ राहणार धुमळीचा मळा,केडगाव, तालुका दौंड जिल्हा पुणे) असे मयताचे नाव आहे.

तेजसने शनिवारी सकाळी काकड आरतीमध्ये मृदंग वादन केले.त्यानंतर तो घरी आला असता मित्रांसोबत फटाके वाजवले. त्यानंतर त्याने गुरांना चारा व पाणी पाजले.परत मित्रांसोबत मृदंग वाजवण्याच्या सरावासाठी गेला.घरी परत आल्यानंतर त्याला अचानक त्रास जाणवू लागला.त्यानंतर त्याला केडगाव खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्रास वाढल्याने रात्री विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.परंतु अचानक तब्येत खालावल्याने त्याचे जागीच निधन झाले.रविवारी सकाळच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.केडगाव सोसायटीचे विद्यमान चेअरमन पंढरीनाथ गायकवाड यांचा तो नातू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *