बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? सुनेत्रा पवार यांचा “भावी खासदार” म्हणून उल्लेख

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? सुनेत्रा पवार यांचा “भावी खासदार” म्हणून उल्लेख

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या येथून निवडणूक लढतील अशी चर्चा रंगली होती.

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचंही काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण लढणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली असताना त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालय भागात या आशयाचे पोस्टर्स लागले आहेत, जे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सुनेत्रा पवार यांना फोटो आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. माजी नगरसेविका प्रतीक्षा धुरी यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *