बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोना संसर्ग

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोना संसर्ग

पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *