पुणे
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्युच प्रकरण अजुन ताज आहे.राज्यातील अन्य भागातही विवाहित महिलांना होणाऱ्या त्रासाच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या आहेत. त्याचवेळी पुण्यात मात्र एक वेगळं आणि तितकंच धक्कादायक प्रकरण घडलं आहे.
पुण्यातील कोरेगाव मुळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे. सूरज पवार (वय 32) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानं बुधवारी स्वत:चं आयुष्य संपवलं. सूरजनं आत्महत्येपूर्वी स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला होत असलेल्या त्रासाची माहिती रेकॉर्ड केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी सूरजची पत्नी मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव (वय 26 ) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आला आहे. सततच्या भांडणामुळे आणि मारहाणीमुळे सूरज आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. सुरज आणि मयुरी यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ते लग्नानंतर कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते. बुधवारी किरकोळ कारणांमुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं, अशी तक्रार सूरजच्या वडिलांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 108, 118(1), 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.