बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही,रामदेव बाबांना काळं फासणार;अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती

बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही,रामदेव बाबांना काळं फासणार;अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती

पुणे

बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.महिलांनी काय घालायाच काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. बाबा रामदेव यांचं हे वादग्रस्त वक्तव्य अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती.

महिलांनी साडी सलवार घालणे इथपर्यंत मान्य पण पुढचं विधान कितपत योग्य आहे, असा सवाल ठोंबरे यांनी उपस्थित केला. रामदेव बाबांचं डोकं खाली आणि पाय वर करा म्हणजे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही.रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार, असा इशाराही त्यांनी दिला. गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी. भाजप निगडीत लोक वारंवार महिलांचा अपमान करतात याची आठवणही रुपाली ठोंबरे यांनी यावेळी करुन दिली.

काय म्हणाले होते रामदेवबाबा

ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *