बहीणीची छेड काढल्याचा राग आला भावाला;छेड काढणारा मुकला जीवाला

बहीणीची छेड काढल्याचा राग आला भावाला;छेड काढणारा मुकला जीवाला

पुणे

काल दुपारी पुण्यानजीक असणाऱ्या चाकण परिसरातील पीडब्ल्यूडीच्या मैदानात एका अल्पवयीन तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मृत तरुणानं आरोपी तरुणाच्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

आरोपी मन्सूरनं मृत अल्पवयीन तरुणाचं आपल्या दुचाकीवरून अपहरण केलं होतं. यानंतर आरोपी मन्सूरनं त्याला चाकण येथील मार्केट यार्डसमोर मोकळ्या मैदानात आणलं. याठिकाणी अराफत आणि त्याचे अन्य पाच मित्र आधीपासूनच उभे होते. तरुणाला याठिकाणी आणताच सर्वांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही. तर आरोपी अराफतनं आपल्या हातातील लोखंडी रॉडने तरुणीच्या डोक्यावर जबरी प्रहार केला. तर आरोपी युसूफ काकर यानं दगडानं तरुणाचं डोकं ठेचलं. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

केवळ बहिणीची छेड काढली या कारणातून आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं संबंधित तरुणाला भयंकर शिक्षा दिली आहे. काल दुपारी एका स्थानिक नागरिकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी युसूफ काकरला अटक केली आहे, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *