बघा आता हे प्रेम!!!!!                        अल्पवयीन प्रियकरासाठी तरुणीने आईच्या मैत्रीणीच्या घरात केली तब्बल नऊ लाख रुपयांची चोरी

बघा आता हे प्रेम!!!!! अल्पवयीन प्रियकरासाठी तरुणीने आईच्या मैत्रीणीच्या घरात केली तब्बल नऊ लाख रुपयांची चोरी

मुंबई

नालासोपारा एव्हरशाईन सिटी येथे प्रियकरासोबत मजेत ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी एका युवतीने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने आईच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून लाखो रुपये चोरी केली. आणि या माध्यमातून गाडी, फ्रीज, सोफा आदी वस्तू खरेदी केल्या.या युवतीला आचोळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

तसेच तिच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रश्मिगार्डन, एव्हरशाईन सिटी येथे राहणाऱ्या दिव्या सुरेश पटेल यांच्या घरी राहत्या घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता आणि त्यांच्या घरातील एका लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख 36 हजार रुपये रोख रक्कम मिळून अशी एकूण 9 लाख 36 हजार रुपयांची चोरी केली होती.

मात्र, चोरी कोणी केली, याबाबत कोणताही सुगावा नव्हता.असे असताना सहाय्यक फौजदार राजेश काळपुंड यांनी पटेल यांच्या घरी कोण कोण आले होते, त्याची माहिती काढली आणि पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सुधीर गवळी, यशपाल सुर्यवंशी, सहाय्यक फौजदार राजेश काळपुंड, पो.हवा. दत्तात्रय धायगुडे, पोलीस शिपाई बालाजी संगमे, कपील बंडगर, विनायक कचरे यांनी सापळा रचून हर्षिता व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.अल्पवयीन प्रियकर मुलाच्या राहण्यात,वागण्यात बदल झाला होता. त्याने फ्रीज, आयफोन,केटीएम बाईक, फर्निचर, वस्तू विकत घेतल्या होत्या.पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांकडे चौकशी केली असता मीच त्याला पैसे दिले होते,असे त्याच्या वडिलांनी सांगितले होते.

अल्पवयीन मुलगा आपले जबाब सारखे बदलत होता. मात्र, जेव्हा त्याने दिलेले पैसे कुठून आले याचा शोध घेतल्यावर अल्पवयीन मुलाने मी आणि हर्षिता यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.हर्षिता आणि तिच्या प्रियकराने ऐशोआराम खाण्या-पिण्यावर तब्बल दीड लाख खर्च केले होते. तर उरलेल्या पैशात फ्रीज, आयफोन, केटीएम बाईक, फर्निचर, वस्तू विकत घेतल्या होत्या. आचोळे पोलिसांनी चोरी केलेले 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीच्या रक्कमेतून खरेदी केलेला आयफोन, केटीएम मोटर सायकल, फर्निचर, फ्रिज अशा महागड्या वस्तु तसेच 4 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *