प्राथमिक शाळेचं शिक्षण दर्जेदार व्हावे तसेच विद्यार्थ्यांच मनोबल वाढावे यासाठी प्रयत्नशील : विशाल लवांडे

प्राथमिक शाळेचं शिक्षण दर्जेदार व्हावे तसेच विद्यार्थ्यांच मनोबल वाढावे यासाठी प्रयत्नशील : विशाल लवांडे

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सिंगापुर या ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणुक पार पडली. या निवडणुकीत शिवतारे गटाने सत्ता खेचत आणुन विरोधी गटाचा पराभव करीत विजय संपादित केला होता.

याचाच एक भाग म्हणुन सिंगापूर गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विशालदादा लवांडे मित्र परिवार यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पॅड वाटप करण्यात आले.

येत्या काळामध्ये प्राथमिक शाळेचं शिक्षण दर्जेदार व्हावे विद्यार्थ्यांच मनोबल वाढावे आणि या शाळेमधून एखादा उच्च पदस्थ अधिकारी निर्माण व्हावा,गावच नावलौकिक वाढावं हाच एक प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेऊन या पुढील काळामध्ये सुद्धा नामदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार : विशालदादा लवांडे,
सदस्य,ग्रामपंचायत सिंगापूर

या कार्यक्रमासाठी सिंगापूरचे सरपंच संगीता हनुमंत वारे,उपसरपंच सौरभ लवांडे,सदस्य विक्रांत पवार,मा सरपंच दशरथ लवांडे,सदस्य अर्चना लवांडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुनीलशेठ लवांडे,मा अध्यक्ष श्रीहरी लवांडे,मा सदस्य बाळासाहेब वारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *