प्रशांत आष्टीकर विरोधात सासवड पोलिसांकडे तक्रार ; पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने दाखल केली तक्रार

प्रशांत आष्टीकर विरोधात सासवड पोलिसांकडे तक्रार ; पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने दाखल केली तक्रार

पुरंदर

भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस.एस.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेच्या बद्दल फेसबुक,व्हाट्सएप आदि समाज माध्यमावर प्रशांत आष्टीकर या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने अवमान कारक तसेच मानहानीकारक अशा पोस्ट समाज माध्यमावर  प्रसारित केल्या आहेत. म्हणून प्रशांत आष्टीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा मागणीची तक्रार सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्याकडे मराठी पत्रकार परिषद संचलित पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली आहे.

भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व त्यांचे कुटुंबीय व मराठी पत्रकार परिषदेबद्दल फेसबुक आणि व्हाट्सएप वरुन बदनामी करणाऱ्या पोस्ट विकृत मनोवृत्तीच्या प्रशांत आष्टीकर याने केल्या आहेत. या प्रकाराचा राज्यभरात मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध केला जात असुन मुंबई, पुण्यासह राज्यभरात आष्टीकर विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात येत आहेत.

त्या नुसारच आज गुरवार दि. २४ ऑक्टोबर रोजी  मराठी पत्रकार परिषद संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड पोलीस स्टेशनच्या निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्याकडे दाखल केली आहे. यावेळी या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिष्टमंडळाशी बोलताना पोलिस निरिक्षक घोलप यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार व संस्थापक दत्तानाना भोंगळे ,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, सहसचिव मंगेश गायकवाड, खजिनदार निलेश भुजबळ,सोशल मीडिया सहसचिव हनुमंत वाबळे, महिला संघटक छायाताई नानगुडे, अमृत भांडवलकर, ए.टी. माने, आझिम आतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *