पोलिसाच्या वेशात आला देवदूतच !!!!! धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या महिलेचे पोलिस जवानाने वाचवले प्राण

पोलिसाच्या वेशात आला देवदूतच !!!!! धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या महिलेचे पोलिस जवानाने वाचवले प्राण

अकोला

धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या एका महिलेचे आरपीएफच्या जवानाने प्राण वाचवले आहेत. अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा एक्सप्रेस जात असताना एक महिला धावत्या रेल्वे खाली पडत होती. ही बाब कर्तव्यावर असणाऱ्या एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला दिसताच रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवत या महिलेचे प्राण वाचवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बी. आर. धुर्वे असं या आरपीएफ पोलिसांचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.हा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामुळे या रेल्वे पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेला वाचवण्यासाठी पोलिसाच्या वेशात देवदूतच आला अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *